महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : नीरा
पुरंदर तालुक्यातील निरा येथील एका वृद्ध महिलेच्या डोक्यात बॅट मारल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तिच्या पतीकडून शुल्लक कारणातून ही घटना झाल्याचे स्थानिक नागरिकांकडून व असणाऱ्या कृत्या वरून माहिती स्वरूपात पुढे आली आहे
ही घटना पुरंदर तालुक्यातील नीरा येथील वार्ड नं. सहा मध्ये राहणारे जमेला दस्तगीर पठाण वय ५५ वर्ष व दस्तगीर सिकंदर पठाण वय ६० वर्षे यांच्या मध्ये आज सकाळी झालेल्या शुल्लक कारणा वरून वाद झाला वादाचे कारण अद्याप समजू शकले नाही. वादाचे रूपांतर हणामारीत झाले.पती दस्तगीर पठाण यांनी पत्नी जमेला हिच्या डोक्यात बॅट मारली. मार जिव्हारी लागल्याने व डोके फुटले त्यामुळे ही महिला जागाईच ठार झाली. यानंतर नीरा येथील पोलीस राजेंद्र भापकर व पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी तातडीने घटना स्थळी धाव घेतली. मात्र तो पर्यंत ही महिला मृत झाली होती.
यानंतर या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संबंधित महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत अधिकचा तपास जेजुरी पोलीस करत असल्याचे जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले.