यावर्षी ऑगस्ट महिन्यात २५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. गेल्या ४४ वर्षातला ऑगस्ट महिन्यातला हा सर्वाधिक पाऊस आहे असं हवामान विभागाने म्हटले आहे. याआधी १९७६मध्ये देशात ऑगस्ट महिन्यात तब्बल २८.४ टक्के अधिक पाऊस झाला होता. देशात सध्या सरासरीच्या ९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. सिक्कीम, बिहार, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गुजरात, गोवा या राज्यात अधिक पाऊस झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातल्या धरणातला पाणीसाठाही अधिक असल्याचं केंद्रीय जल आयोगाने म्हटले आहे.
महाराष्ट्रात गेले दोन दिवसा चांगला पाऊस पडत आहे. मुंबई आणि उपनगरात चांगला पाऊस कोसळत आहे. नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, पालघर, वसई याठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अधूनमधून पाऊस पडत आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही पाऊस पडत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला