महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : प्रतापसिंह भोसले(फलटण)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ , राहुरी संचलित श्रीमंत शिवाजीराजे महाविद्यालय फलटण, जि.सातारा येथे बी.एस.सी.हार्टिकल्चर ४ थ्या वर्षात शिक्षण घेत असलेली कृषी कन्या गौरी मोहन मुळीक हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत फलटण तालुक्यातील सासकल येथे वृक्षारोपण करून वृक्षारोपनाचे महत्व ग्रामस्थांना पटवून दिले .
श्रीमंत शिवाजीराजे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सागर निंबाळकर , कार्यक्रम अधिकारी प्रा.अमितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या गौरी मोहन मुळीक हिने सासकल ( ता. फलटण ) ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण केले .
कार्यक्रमास सरपंच लता मुळीक, उपसरपंच संजय चांगन, विकास मुळीक , ग्रामसेवक , आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.