विक्रमसिंह भोसले यांनी दिला ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा
फलटण तालुका प्रतिनिधी. फलटण तालुक्यातील साखरवाडी या ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली होती या निवडणुकीमध्ये विक्रम सिंह भोसले यांनी दोन वार्डमधून निवडणूक लढवली होती ते दोन्ही जागेवरून निवडून आले असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार कोणत्याही प्रतिनिधीला एका जागेचे सदस्यत्व सोडावे लागते .
त्यामुळे त्यांनी वार्ड क्रमांक. २ येथून सदस्यत्व पदाचा राजीनामा दि.२१. जानेवारी.२०२१. जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला आहे तसे पाहता साखरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय अटीतटीची लागली होती या ग्रामपंचायतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते विशेष ता विधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी लक्ष घातले होते परंतु याठिकाणी राजे गटाच्या ७ जागा व माजी सरपंच गटाच्या ८ व पाटील गटाच्या २ जागा निवडून आल्या असून आता या ठिकाणी १ जागे चा राजीनामा दिल्यामुळे वार्ड क्रमांक. २ मधून पोटनिवडणूक लागणार आहे.व १६ जागांसाठी सरपंच पदाची निवडणूक पार पडणार आहे . कोणाच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.व पूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे.