अपशिंगे (मि) येथील सौ शशिकला रामकृष्ण निकम यांचे दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले.त्या ए. एस. पी.कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल अपशिंगे (मि) या शाळेच्या संचालिका होत्या, त्यांनी आपल्या मुलांना उत्तम संस्कार देऊन शासकीय, शैक्षणिक, आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये जाण्यास प्रवृत्त केले, त्यांच्या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जनाचा विधी रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी नऊ वाजता अपशिंगे (मि) येथे होणार आहे.