उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांची खाजगी सेंटरमध्ये मोफत सोनोग्राफी
8 सोनोग्राफी सेंटरचा सहभाग,दररोज दोन सेंटरमध्ये सहा रूग्णांची होणार सोनोग्राफी
मनोज माळी यांच्या आंदोलनाचे यश.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराडच्या सौ.वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातुन पाठवण्यात येणाऱ्या दररोज सहा रूग्णांची खाजगी सोनोग्राफी सेंटरमध्ये मोफत सोनोग्राफी करण्यात येणार आहे. उपजिल्हा रूग्णालयातील मशिनद्वारे आठवडयातील दोन दिवस सोनोग्राफीची सेवा सुरू रहाणार आहे.प्रहारचे मनोज माळी यांच्या आंदोलनाची दखल घेऊन शहरातील रडिओलॉजिस्ट व आरोग्य प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.प्रत्यक्षात या सेवेस प्रारंभ झाला आहे. उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयीबाबत प्रहारचे मनोज माळी यांनी उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रवेशद्वारा समोर सात दिवस उपोषण केले होते.या आंदोलनाची दखल घेऊन आरोग्य मंत्र्यांच्या वतीने मंत्रालयात बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. या बैठकीत उपजिल्हा रूग्णालयातील बहुतांष गैरसोयी दुर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.तर उपजिल्हा रूग्णालयाला एक कायमस्वरूपी स्त्री रोग तज्ञ उपलब्ध करून देण्यात आले आहे. उपजिल्हा रूग्णालयात सोनोग्राफीचे मशिन आहे.मात्र रेडिओलॉजिस्ट नसल्याने उपजिल्हा रूग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रूग्णांना आर्थीक झळ सोसुन खाजगी सोनोग्राफी सेंटरमध्ये जावे लागत होते. याबाबत मनोज माळी यांनी आवाज उठवत रेडिओलॉजिस्टची मागणी केली होती. प्रशासनाला तत्काळ कायमस्वरूपी रेडिओलॉजिस्ट उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने आरोग्य प्रशासनाच्या वतीने शहरातील खाजगी रेडिओलॉजिस्टची बैठक घेण्यात आली होती.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला डिवायएसपी डॉ.रणजीत पाटील व पोलिस निरीक्षक बि.आर.पाटील उपस्थीत होते.या बैठकीत सामाजीक बांधिलकीच्या भावनेतुन शहरातील रेडिओलॉजिस्टनी उपजिल्हा रूग्णालयातील गोरगरीब रूग्णांना मोफत सोनोग्राफीची सेवा देण्याचे आव्हान करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत रेडिओलॉजिस्टनी आठवडयातील 4 दिवस दररोज दोन सेंटरमध्ये सहा रूग्णांची मोफत तपासणी करण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार आता दर सोमवारी वत्सल सोनोग्राफी सेंटर व संकेत सोनोग्राफी सेंटर, बुधवारी आदिती सोनोग्राफी सेंटर व मोरया सोनोग्राफी सेंटर,गुरूवारी निष्कर्श सोनोग्राफी सेंटर व श्री साई सोनोग्राफी सेंटर शनिवारी ऍक्सिस डायग्नॉसिस सेंटर व लोटस सोनोग्राफी सेंटर याप्रमाणे दररोज दोन सेंटरमध्ये प्रत्येकी तीन प्रमाणे सहा रूग्णांची मोफत सोनोग्राफी करण्यात येणार आहे.यासाठी उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांचे पत्र घेऊन रूग्णास त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. उपजिल्हा रूग्णालयात सोनोग्राफी मशिन आहे.एका खाजगी रेडिओलॉजिस्टची यासाठी नेमणुन करण्यात आली आहे. आठवडयातील मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी हे रेडिओलॉजिस्ट उपजिल्हा रूग्णालयात येऊन रूग्णांची सोनोग्राफी करीत आहेत. रूग्णांना मोठा दिलासाकराड,पाटणसह कडेगाव तालुक्यातील गोरगरीब रूग्ण उपजिल्हा रूग्णालयात येतात.या ठिकाणी यंत्रसामुग्री असतानाही केवळ तज्ञ नसल्याने रूग्णांना खाजगी ठिकाणी जावे लागत होते.याबाबत मनोज माळी यांनी आवाज उटवल्यानंतर व मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केल्याने आता उपजिल्हा रूग्णालयातील बहुतांश गैरसोयी दुर झालेल्या आहेत.यामुळे गोगरीब रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.






















