पांचगणी : शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेना या संघटनेच्या पद नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये जावळी तालुका अध्यक्षपदी उमेश दुर्गावळे यांची तर उपाध्यक्षपदी रवी पार्टे यांची निवड झाल्याने जावळी शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे.
महाबळेश्वर येथे झालेल्या निवडीच्या कार्यक्रमात खासदार शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक आमदार दगडू दादा सकपाळ यांच्या हस्ते आणि दादांच्या महाबळेश्वर येथील तेजस बंगलो या निवासस्थानी दादांच्या हस्ते या निवडी सम्पन्न झाल्या यावेळी
शिवसेना प्रणीत शिव सामर्थ्य सेनेचे अध्यक्ष संदीप तानाजी भोज व सरचिटणीस जितेंद्र दगडू सकपाळ, संपर्कप्रमुख अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव सामर्थ्य सेनेच्या सांगली जिल्हा व साताऱ्यातील जवळी तालुक्याच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका अध्यक्ष पदी उमेश दुर्गावळे, तालुका उपाध्यक्ष पदी रवींद्र पार्टे यांना नियुक्तीपत्र देऊन नेमणुका जाहीर केल्या त्याप्रसंगी सातारा जावळीतील शिवसेना जावळी सातारा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, केरघळ शहर प्रमुख बाळासाहेब शिर्के, वैद्यकीय मदत कक्षाचे प्रकाश गोळे, लहुराज सुर्वे, नितीन गोळे, समिर गोळे, बाळू यादव व इतर पदाधिकारी उपस्थित होते
या निवडीने जावळी तालुक्यात युवा कार्यकर्त्यामध्ये नवा जोश निर्माण होऊन सेनेमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे. या निवडीचा येणाऱ्या निवडणुकांत सेनेला नक्कीच फायदा होणार आहे.
शिव सामर्थ्य निवडीच्या निमित्ताने नवनिर्वाची तालुका अध्यक्ष उमेश दुर्गावळे व उपाध्यक्ष रवी पार्टे यांनी शिवसेनेला तालुक्यात तुल्यबळ पक्ष म्हणून निर्माण करून आमची ताकद नक्कीच दुसऱ्यांना आत्मचिंतन करण्यास लावेल असे काम करून दाखवू असे दोघांनी यावेळी सांगितले.