महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी :बिदाल
माण तालुक्यातील थदाळे गावामध्ये शेतकऱ्याच्या विकास सेवा सोसायटीचा भोगळ कारभार समोर आला आहे. विकास सेवा सोसायटीमधील शिपाई पदावर कार्यरत असणारे जाधव याचे गेली ५७ महिन्यापासून त्याचे मानधन देण्यात आले नाही .
थदाळे सोसायटीच्या कार्यकारी संचालक मंडळ याबाबतीत लक्ष घालत नाही.सदरच्या झालेल्या मानधनच्या अफरातफर केलेला आहे. तात्याबा जाधव गेली १५ वर्षापासून सोसायटीत शिपाई म्हणून काम करीत आहेत. दरमहा ३०००/- प्रमाणे ५७ महिन्याचा एकूण पगार १११०००/- रूपये सोसायटीकडून येणे बाकी आहे. चेअरमन व सचिव संचालक यांनी पगार देण्याबाबत विचार करू सांगून शिपाई जाधव यांच्या तोंडाला आश्वासनाची पाने पुसण्याचा प्रकार थदाळे गावात घडला आहे. तात्याबा जाधव यांच्या पगारावरच कुंटुंबाचा उदनिर्वाह सुरू आहे.
पाच वर्ष होत आले असून एकाही महिन्याचा पगार शिपाईचा सोसायटीने केलेला नसल्याने जाधव कुटुंबाची आर्थिक अडचण झाली असून कुंटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
थदाळे सोसायटी कार्यालयात पगार देण्यात यावा यासाठी गेले असता कामावरून आपणास काढून टाकण्यात येईल अशी धमकी देण्यात आली.























