महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :लोणीभापकर
महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना कळवण्यात येते की जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे साहेब यांच्या आदेशानुसार असे आव्हान करण्यात येत आहे की दरवर्षी आपण आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २२९ वी शासकीय जयंती भिवडी ता.पुरंदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो पण ह्यावर्षी तसे न करता फक्त संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी तसेच पुरंदर तालुक्यातील शासकीय अधिकारी प्रांत साहेब, तहसीलदार,भोर उपविभागीय अधिकारी,सासवड पोलिस स्टेशन चे पी.आय, तसेच भिवडी गावचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना मानवंदना देण्यात येणार आहे..
देशात व राज्यात कोविड १९ (कोरोना) या महाभयंकर साथीच्या रोग आल्याने आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती म.पो.भिवडी ता.पुरंदर जि.पुणे येथिल शासकीय स्मारक राजभवन येथे सोमवार दिनांक- ७ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजता जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रमुख पदाधिकारी व शासकीय आधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये मानवंदना कार्यक्रम होणार आहे तरी महाराष्ट्रातील तमाम रामोशी, बेरड, बेडर समाज बांधवांनी ही जयंती सोशल डिस्टंट पाळून प्रत्येकाने आपापल्या घरी साजरी करावी.
कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेता आपण सर्वांनी भिवडी या ठिकाणी कुणीही ज्योत आणण्यासाठी येऊ नये. आपल्याच गावातील ग्रामपंचायत,शाळा,पोलिस स्टेशन,आरोग्य दवाखाना,इ.शासकीय ठिकाणी मास्क,सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करून आपल्या राजाची जयंती साजरी करावी असे आव्हान जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा पुर्व अध्यक्ष पैलनान नाना मदने यांनी केले आहे
Like this:
Like Loading...
Related