महाराष्ट्र न्यूज पाटण प्रतिनिधी :
एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या माध्यमातून नेहमीच जनहितार्थ उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमांमुळे कुपोषण आटोक्यात आणण्यात यश आले याबाबतची जनजागृती करण्यासाठी शासनाने एक नवीन पाऊल टाकले आहे. तरंग सुपोषित महाराष्ट्राचा या डिजिटल समुपदेश प्लॅटफॉर्म कार्यपद्धतीमुळे निश्चितच समाज सुदृढ व समृद्ध होईल असा विश्वास पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार यांनी व्यक्त केला.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प पाटण यांच्यावतीने आयोजित तरंग सुपोषित महाराष्ट्राचा या डिजिटल समुपदेशक प्लॅटफॉर्म कार्यपद्धतीबाबत प्रचार व प्रसाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी विजय विभुते, पर्यवेक्षिका सौ. एस. डी. पाटील, तालुका समन्वयक आनंदा शेवाळे, सतीश देसाई तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक आदी उपस्थित होते. विजय विभूते यांनी उपक्रमाची माहिती दिली.
































