महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आणखी एक नातू राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.खा. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना कन्या रेवती, पुत्र विजय ही दोन मुले आहेत.
शरद पवार याच्या गाडीचे स्टिअरिंग त्यांच्या आणखी एका नातवाच्या हातात गेलं आहे. खा. सुळे यांचे चिरंजिव विजय सदानंद सुळे यांना वाहन परवाना मिळाला. नंतर विजय याने थेट आजोबा शरद पवार यांना गाडीतून फेरफटका मारला. सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात एक व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला. आहे. शरद पवार शेजारच्या सीटवर बसून आपल्या नातवाला ड्रायव्हिंगचे धडे देत आहेत. त्यामुळे शरद पवार आपल्या नातवाला ‘राजकीय स्टिअरिंग’ हाती धरण्याचे ट्रेनिंग देणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.त्यामुळे पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्याप्रमाणे शरद पवार हे रेवती आणि विजय यांनाही राजकीय आखाड्यात उतरवणार का ? अशीही चर्चा सुरू झाली आहे.























