जनतेतून मागणी; पुन्हा शासकीय आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :पाचगणी
महाबळेश्वर तालुक्याच्या दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेच्या खाजगी संस्थांच्या बेभरावशे अनास्थेमुळे आरोग्य विस्कळीत झाली तर आहेच. यातही वरिष्ठ शासकीय वरदहस्ताने या संस्था अधिकच निर्ढावल्या आहेत.त्याचा नाहक त्रास मात्र कोरोना संसर्गात महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा, तळदेव, तसेच महाबळेश्वर वाशिय सर्वसामान्य जनतेला बसतोय.त्यामुळे बेलअर या खाजगी संस्थेकडे हस्तांतरित केलेली प्रा. उप. केंद शासकीय सेवेच्या माध्यमातून लोकांच्या सेवेस पुन्हा उपलब्ध व्हावीत अशी महाबळेश्वर तालुक्यातील जनतेतुन एकमुखी मागणी पुढे येतेय..
बेल एअर संस्थेने महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव,तापोळा ही आरोग्य सेवा शासनाकडून हस्तांतरीत तर मोबाईल मेडिकल युनिट हि एका फौंनडेशनच्या ताब्यात.!
तालुक्यात फक्त पांचगणी आरोग्य केंद एकमेव शासकीय सेवा देणारे केंद्र याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष मात्र खाजगी संस्थांना वरदहस्त त्यामुळेच त्यामुळेच तालुक्यात सर्वत्र या बाबत नाराजी आहेच कांदाटी,कोयना,सोळशी विभागात प्रचंड नाराजी असून आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत नसलेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत,नुकत्याच झालेल्या पंचायत समितीमध्ये बेल एअर च्या कामाचे वाभाडे काढले असून देखील त्यांच्या कारभारात काही सुधारणा झाली नाही, आरोग्य विभागाच्या इतर अधिकाऱ्यांसोबत तळदेव व तापोळा आरोग्य केंद्रास भेट दिली, भेटी दरम्यान दोन्ही केंद्रात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.
याबाबतची कसलीच माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयास दिली जात नाही,जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व ग्रामीण रूग्णालयांत कोव्हिड सेन्टर सुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत मग खाजगी संस्थेच्या ताब्यात असणाऱ्या महाबळेश्वर ग्रामीण रुग्णांलयात का नाही असा प्रश्न तालुक्यातील नागरिक विचारीत आहेत.पूर्वी प्रमाणे ही आरोग्य केंद्रे व मोबाईल मेडिकल युनिट शासनाने पुन्हा चालवण्यासाठी घ्यावीत अशी एकमुखी मागणी तालुक्यातील नागरिक करीत आहेत, तालुका दुर्गम असल्याने तालुक्यातील तापोळा, तळदेव, महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय, इतर उपकेंद्रे यांच्या माध्यमातून हि आरोग्य सेवा शासकीय यंत्रणेच्या अखत्यारीत असेल तरच हि सेवा तळागावातील सर्वसामान्य रुग्णांपर्यँत पोहचणार आहे.
प्रतिक्रिया: बेलअर हॉस्पिटलने तापोळा व तळदेव, आरोग्य केंद्र चालविण्यास घेतल्याने आरोग्य सेवा पुरविणे त्याची नैतिक जबाबदारीच आहे. त्यामुळे कोणतीही सबब न देता आरोग्य सुविधा नाकारू नये. जमत नसेल तर जबाबदारीतुन मुक्त व्हावं शासन आरोग्य सेवा देण्यास बांधील आहेच..!संजय महादेव उत्तेकर सरपंच वानवली, ता महाबळेश्वर