महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
महाविकास आघाडी सरकारने राज्यात कोरोना प्रती चाचणीचे दर आणखी कमी केले आहेत . कोरोना चाचणीसाठी आता फक्त 1200 रुपये द्यावे लागणार आहेत. पूर्वी यासाठी 1900 रु.द्यावे लागत होते.तसेच इतर दर 1600 आणि 2000 रु. करण्यात आले आहेत. राज्य सरकारने कोव्हिड चाचणीचे सुधारित दर 7 सप्टेंबर 20 रोजी जाहीर केले आहेत. यासंदर्भात शासकीय आदेश काढला आहे. त्यानुसार फक्त 1200 रुपयांमध्ये कोरोना टेस्ट होणार आहे. चाचणीच्या किमती कमी झाल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना चाचणीचे दर सर्वात कमी असल्याचे म्हटले जात आहे.राज्यात कोणत्याही खाजगी प्रयोगशाळेला अधिक दर आकारता येणार नाहीत. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविला होता.
कोरोना टेस्टची किंमत दुसऱ्यांदा कमी करण्यात आली आहे. अगदी सुरुवातीला खासगी प्रयोगशाळा कोरोना चाचणीसाठी 4500 रुपये आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतला त्यासाठी पीपीई कीटचा वापर यामुळे 5200 रुपये आकारले जात होते.