फलटण : फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवेदानाद्वारे कळवण्यात आले आहे की, अनंत चतुर्दशी तथा गणपती विसर्जन असल्याने मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्यासाच्या दृष्टिकोनातुन फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती ने भुसार मार्केट पूर्णपणे रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवार दि.19/09/2021 रोजी भुसार मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे, सोमवार दि.20/09/2021 रोजी आवक उतरविली जाईल. तसेच त्याच दिवशी लिलाव होतील. सदर बदलाची सर्व घटकांनी नोंद घ्यावी.असे सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती फलटण जि.सातारा यांनी एका निवेदानाद्वारे कळविले आहे.





















