महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : बिदाल
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे शंभू महादेवाचे देवस्थान शिखर शिंगणापुरमध्ये आहे. शंभू महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्ताची मोठी गर्दी होत असते. शंभू महादेवाचे दर्शन झाल्यावर बहुतांशी शिवभक्त गुप्तलिंग या तीर्थक्षेञाच्या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात. सुमारे तीन किमी अंतरावर निसर्गरम्य वातावरणात वसलेले धार्मिक ठिकाण आहे. गुप्तलिंग या ठिकाणाला शिवकालिन व ऐतिहासिक मोठा वारसा आहे. तसेच आध्यात्मिक क्षेञ म्हणून ओळखले जाते. गुप्तलिंग हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात असल्याने मंदिर परिसरात मोठी घनदाट हिरवीगार झाडाच्या रांगा आहेत.
त्याबरोबर गुप्तलिंग मंदिरामध्ये अनेक झरे वाहतात. डोंगरभागातून छोटे छोटे धबधबे पावसाळ्यात वाहत असतात . मनमोहित करणारा परिसर आहे. यांचा मनमुराद आनंद शिवभक्त पर्यटक घेत असतात . हा घेत असताना गुप्तलिंग मंदिराकडे जाणारा पायरी रस्ता दोन ठिकाणी पायऱ्यासह डोंगरभागाचा मोठा भुभाग कोसळला आहे. त्यावर असणारे संरक्षक कठडे लोंखडी रिलींगसह ढासळला गेला आहे. झालेल्या पडझडीमुळे शिवभक्ताच्या सुरक्षिततेची समस्या निर्माण झाली आहे. अतिशय धोकादायक परिस्थिती गुप्तलिंग मंदिर परिसरात झाली आहे. संबंधित बांधकाम विभागाने पायऱ्या मार्गासह संरक्षण कठड्याची देखभाल दुरूस्ती करून गैरसोय दूर करण्याची मागणी शिंगणापुर ग्रामस्थासह भाविकभक्त पर्यटकानी व्यक्त केली आहे.
कोरोनाचा परिस्थितीत सद्यातरी शिवभक्त व पर्यटक येत नाही. मंदिरे देवदर्शनासाठी उघडायच्याआत गुप्तलिंग ठिकाण असणाऱ्या समस्या सुटल्या पाहिजेत .
देवदर्शन सुरू होईपर्यत पायरी मार्गाची डागडुजीचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. कारण पडझड झालेल्या ठिकाणी मोठी जिवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. दुरूस्ती होऊ गैरसोय दुर करावी.