
शौर्य दाखवणारया युवकाचा, गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला.
पुजा भिसे, श्रावणी पावस्कर, मनिषा मोळावडे यांनी मनोगते व्यक्त केली. संगिता मोहिते यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन भावना फाटक यांनी केले. प्रास्तविक निशा फाटक यांनी केले तर आभार सुरेश काणे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते, सुरेश चव्हाण, सुनिल क्षीरसागर, स्वप्निल नेवरेकर, सोमनाथ आग्रे, अनिल बनसोडे, नंदकुमार शेडगे, सोमनाथ जंगम, सुरेश काणे, सुरेश कळके, आनंद पावस्कर, तुकाराम शिंदे, कृष्णा शिंदे, प्रमोद पाटेकर, पांडुरंग खैरमोडे, आदींनी परिश्रम घेतले.
उपस्थित महिलांनी विविध शंका विचारल्यावर सर्व प्रश्नांची मधुरा लोंढे यांनी उत्तरे दिली. कै. ज्ञानोजीराव साळुंखे ज्युनियर लेजच्या मुलींनी स्वसंरक्षणासंबधी प्रात्यक्षिके दाखवून उपस्थित महिलांची मने जिंकली. संजीवनी खांडके यांनी भारुडाच्या माध्यमातून विनोदी ढंगातुन सामाजिक संदेश महिलांपर्यंत पोहचवला.

























