महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : दिव्यांग आधार सामाजिक संस्था,कराड चे संस्थापक.सुनील खराडे यांच्या विद्यमाने आयोजित दिव्यांग मेळावा कराड येथे सरचिटणीस,पश्चिम महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सौ.संगिता साळुंखे (माई) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगरसेवक मा.श्री.विजय वाटेगावकर, नगरसेवक मा.श्री.किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी संघटक दिव्यांग संघटना भाग्यश्री काळभोर मॅडम, लोकशाही आघाडीचे खजिनदार श्री.रवींद्र मुंढेकर, संचालक वि वि सोसायटी श्री.रघुनाथ बावडेकर, सतीश मोरे, सुरज जाधव, रोहित कांबळे, प्रसाद मगरे, किशोर कोळी, सतीश भोसले, मनीषा साळुंखे,सौ.राजश्री शिंदे व भागातील दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व आभार श्री.गणेश जाधव (सर) यांनी मानले.