महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर): शहाजीराजे भोसले :
इंदापूर आगारात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या वतीने Covid-19 पासून एस.टी. कर्मचारी यांचा बचाव व्हावा , म्हणून वाफेचे मशीन भेट देण्यात आले .
यावेळी मशीनचे उदघाटन विठ्ठल आप्पा ननवरे यांच्या हस्ते व मेहबूब मनेर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अनिल राऊत शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , नगरसेवक अमर गाडे , नगरसेवक दादासाहेब सोनवणे , प्रा.अशोक मखरे , हरिदास मडके आदी मान्यवर उपस्थित होते. आगारातील जेष्ठ नेते तोरसकर अण्णा , चंदनशिवे , तुषार शिंदे , ढोले , गुरव , अमोल साठे , योगेश भोंग , दादा माने हे उपस्थित होते सूत्र संचालन डाके सर तर आभार प्रदर्शन शिवाजी बंडलकर यांनी केले .