वर्क फ्रॉम होमच्या दरम्यान मोबाइल डेटा जास्त लागत आहे. त्यामुळे रोज १.५ जीबी आणि २ जीबी डेटा अनेकदा अपुरा पडतो. त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला रोज ३ जीबी डेटा प्लान घ्यायचा असेल तर त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील. परंतु या ठिकाणी तीन प्लानसंबंधी माहिती देणार आहोत जे २ जीबी डेटाच्या किंमतीत ४ जीबी डेटा ऑफर करतात. हे तिन्ही प्लान वोडाफोन-आयडियाचे आहेत.
२९९ रुपयांचा प्लान : वोडाफोन-आइडियाच्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. रोज ४ जीबी डेटा दिला जातो. या प्रमाणे ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटाचा वापर करता येतो.
४४९ रुपयांचा प्लान : हा ४९९ रुपयांचा प्लान आहे. यात दुप्पट वैधता मिळते. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. रोज ४ जीबी डेटा मिळतो. याप्रमाणे युजर्संना एकूण २२४ जीबी डेटाचा वापर करू शकतात.
६९९ रुपयांचा प्लान : वोडाफोन-आयडियाचा ६९९ रुपयांचा प्लानमध्ये युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड क़ॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. रोज ४ जीबी डेटा दिला जातो. या प्रमाणे युजर्संना एकूण ३३६ जीबी डेटाचा वापर केला जातो.
याशिवाय सर्व नेटवर्कवर सर्व प्लानवर अनलिमिटेड कॉलिंग,रोज १०० एसएमएस आमि वोडाफोन प्ले आणि झी ५ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.