पाटण : एक रकमी एफ. आर. पी चे तीन तुकडे करण्याचा हा निर्णय म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार असून, हा त्यांच्यावर अन्यायाच आहे. केंद्र सरकारच्या एफ. आर. पी च्या तुकड्याच्या निर्णयानुसार पहिली उचल ही उस गाळप झाल्यानंतर मिळणार, तर उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना हंगाम संपण्यापुर्वी अथवा हंगाम संपल्यानंतर दोन टप्प्यात मिळणार आहे, हि शुद्ध फसवणूक असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाटण तालुकाध्यक्ष विकास हादवे यांनी म्हंटले आहे.
एफ आर पी म्हणजे उस गाळप झाल्यानंतर उसाची बिले साधारणपणे पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायचे हा कायदा आहे. एफ आर पी चे तीन तुकडे केल्यामुळे तर शेतकरी पुरता अडचणीत सापडणार आहे म्हणून, एफ आर पी चे तीन तुकडे करण्याचा कट साखर कारखानदारांनी केंद्र व राज्य सरकारच्या आडून केला आहे. त्याविरोधात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेणे मिस कॉल आंदोलन सुरु केले असून त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.
उस उत्पादकांची १२ ते ३० सप्टेंबर या कालावधीत मिसकॉल मोहीम राबविण्यात येत असून, ८४४८९८३७५१ या नंबर वर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मिस कॉल द्यावा या मोहिमेतून मिळालेला डेटा सर्वोच्च न्यायालयात कारखानदारीच्या व्यापक कटा विरोधात वापरण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे एकरकमी एफ आर पी चे कवच शासन काढून घेणार आहे. आज आपण जर लढलो नाही, तर ऊस उत्पादकांचे भविष्य अंधारात आहे. कारण आज उत्तर महाराष्ट्रात सरासरी रिकव्हरी रेट ९.३ जाहीर केला आहे. त्यामुळे चालू हंगामात शेतकऱ्यांना 60% म्हणजे जवळपास १००० ते १२०० रुपये मिळतील नंतर जे मिळेल त्यात फक्त बँका, सोसायटीचे व्याज आपल्याच पैशातून भरावे लागणार आहे. म्हणूनच या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध लढण्यासाठी शेतकऱ्यांनी मिसकॉल आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन विकास हादवे यांनी केले आहे.































