महाराष्ट्र न्यूज कळंब-इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले
इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी विद्या निकेतन स्कूल व ज्युनिअर काॅलेजचा सन २०२० वर्षाचा बारावी विज्ञान व वाणिज्य दोन्हीही शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे . कु . श्रध्दा राजेंद्र कवडे – देशमुख हिने पीक विज्ञान क्राॅप सायन्स शाखेत २०० पैकी २०० गुण प्राप्त करत राज्यात पहीला क्रमांक मिळवला.
श्रद्धा कवडे – देशमुख हि इयत्ता बारावीच्या बावडा केंद्रात व जय भवानी विकास प्रतिष्ठान संचलित लाखेवाडी येथील विद्यानिकेतन स्कूल व कॉलेजमध्ये ९०.६१ टक्के गुण मिळवून प्रथम आली.
श्रद्धा कवडे – देशमुख हिचे वडील राजेंद्र कवडे – देशमुख उत्कृष्ट पत्रकार असून त्यांचे शिक्षण बी . एस .सी .अॅग्री झाले आहे .
संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले , उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले , सचिव हर्षवर्धन खाडे , मुख्य सल्लागार प्रदिप गुरव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . यावेळी संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .






















