महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / ओझर्डे :
वाई तालुक्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक सामाजिक, राजकीय व्यक्ती आपापल्या परीने समाजासाठी कार्य करीत आहेत. त्यापैकीच बावधन गावचे राजेंद्र आप्पा कदम हे देखील आहेत. सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या या अवघड काळात त्यांनी देखील प्रत्येक वेळी मदत केली आहे. राजेंद्र कदम हे बावधन गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देखील आहेत.
त्यांच्या कारकिर्दीमध्ये बावधन गावच्या ग्रामपंचायतीने चांगली कामे केली आहेत. या काळात त्यांनी नळ पाणी पुरवठा योजना तसेच ग्राम स्वच्छता अभियान राबवून आपले राजकारणातले भक्कम स्थान कायम करून ठेवले, तसेच मागील वर्षी वाई पोलीस स्टेशनला निवेदन दिले, की बावधन गावात प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. तसेच राजेंद्र कदम हे लोकांच्या मदतीला कायम उपस्थित असतात. या कोरोनाच्या आजारांमध्ये प्राणवायूचा भरपूर मोठा उपयोग होत आहे. त्यामुळे ऑक्सीजन सिलेंडर राजेंद्र कदम व त्यांच्या परिवाराकडून ग्रामीण रुग्णालय बावधन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी तेथे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामीण रुग्णालय बावधनचे सर्व कर्मचारी, डॉक्टर व राजेंद्र कदम, मनीषा कदम, प्रतीक कदम, पप्पू भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.