दि. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त लोणंद येथील अंबिका ग्रुपच्या अध्यक्ष दर्शना रावळ यांच्यावतीने लोणंद मधील कर्तृत्ववान महिलांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दैनिक महाराष्ट्र न्यूज च्या वतीने कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थ मानाचा फेटा देऊन सन्मान करण्यात आला. व याच वेळी महाराष्ट्र न्यूज चे जागतिक महिला दिन विशेष अंक प्रकाशन कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता क्षमा शहा यांनी केली तर डॉ. स्वाती शहा यांनी आभार मानले.
ममता अरोरा, शानू चंद, क्षमा शहा, डॉक्टर स्वाती शहा, रजनी शिंदे, सुचेता हडंबर, शोभा क्षीरसागर, समता आश्रम शाळेच्या मुख्यध्यापिका विमल आनंदा सूर्यवंशी, विश्व ज्योत इंटरनॅशनल स्कूल च्या मुख्यध्यापिका श्रीनीला काला, शिल्पा पवार, दैनिक महाराष्ट्र न्यूज लोणंद प्रतिनिधी बिल्किस पठाण शेख व डॉक्टर मनीषा काकडे यांचा सत्कार अंबिका ग्रुपच्या अध्यक्ष दर्शना रावळ यांच्या हस्ते करण्यात आला. तर दर्शना रावळ यांचा सत्कार दै. महाराष्ट्र न्यूज च्या पत्रकार बिल्किस पठाण शेख यांच्या हस्ते करण्यात आला.