महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी (गणेश पवार) –
सुमारे ३६ वर्षापासून महाराष्ट्रातील खाजगी व सहकारी साखर कारखान्यात आपल्या कार्याने व कल्पक कर्तुत्वाने आपल्या कामाचा ठसा उमटवणारे श्री दत्त इंडिया कंपनीचे उपाध्यक्ष श्री मृत्युंजय शिंदे यांनी आज पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेसाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज कोविड १९ संक्रमणाचे सर्व शासन नियम पाळून आपल्या समर्थकांसह अर्ज दाखल केला.
मृत्युंजय शिंदे अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून सहकार क्षेत्रात आले असून या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वकर्तृत्वाने आपले नाव व स्थान कमावले आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील ऊस तोड मजूर, कामगार ,अधिकारी व कारखान्याशी संबंधित असणाऱ्यांशी त्यांचा भरपूर दांडगा जनसंपर्क आहे. अनेकांना त्यांनी या क्षेत्रामध्ये भरपूर नोकऱ्याही मिळवून दिल्या आहेत. मतदारसंघातील पदवीधरांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक जण उच्चशिक्षित असूनही बेरोजगार आहेत. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा शासनाकडून बेरोजगारांना भत्ते मिळावेत. नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व प्रलंबित प्रश्नांना योग्य न्याय देता यावा या बेरोजगार तरुणांचा आवाज राज्याच्या मुख्य सभागृह पर्यंत जावा यासाठी ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते स्वतः कोकण कृषी विद्यापीठातून कृषी विभागाचे पदवीधर आहेत. त्यामुळे शेतकरी व शेती विषयक प्रश्नांची त्यांना जाण आहे. म्हणून आमदारकी ही शोभेसाठी किंवा दिखाव्यासाठी न घेता तिचा उपयोग शेतकरी व शेतकऱ्यांचे पदवीधर मुले यांच्यासाठी करावयाचा असा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली नाही. अपक्ष म्हणून ते निवडणूक लढणार आहेत. त्यांचा प्रचंड जनसंपर्क पाहता त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो असे जाणकारांचे मत आहे शिंदे यांच्या उमेदवारीमुळे पक्ष्यांच्या अधिकृत उमेदवारांना याचा फटका बसू शकतो म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना संपर्क साधायला सुरुवात केली आहे.