महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :पाचगणी
बहुमतात गेलेल्या विरोधकांना धोबी पछाड करीत ९- ९ अशा समसमान स्थितीत असताना विनोद वसंतराव बिरामणे यांच्या पारड्यात कास्टींग वोट टाकत दुसऱ्यांदा उपनगराध्यक्ष पद बहाल केले.
पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत पांचगणी करांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती या निवडीसाठी पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आज पाचगणी नगरपरिषद कार्यालयात ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष सभा घेण्यात आली.
६ जुलै रोजी उपनगराध्यक्ष अनिल वन्ने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर कोरोना संकट उधभवल्याने या निवडीचा रेंगाळल्या होत्या. त्यामुळे नव्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी हि सभा बोलावण्यात आली होती.
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेत विनोद बिरामणे यांचे दोन अर्ज तर तर सौ अर्पणा मिलिंद कासुर्डे यांचा ऐक अर्ज दाखल झाला. दोन अर्ज दाखल झाल्याने निवडणूक मतदानावर आली. यावेळी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पद्धतीने हात वर करून मतदान झाले. यामध्ये विनोद बिरामने यांना ९ मते पडली तर अर्पना कासुर्डे यांना ९ मते पडली. समसमान मते पडल्याने शेवटी नगराध्यक्षांना कास्टिग व्होट चां अधिकार असल्याने नगराध्यक्षा सौ लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी विनोद बिरामने यांच्या बाजूने हात वर केल्याने या निवडणुकीत विनोद बिरामने हे ऐका मताने विजयी झाले. आणि दुसऱ्यांदा उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत विराजमान झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगराध्यक्षा सौ लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी काम पाहिले तर यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर उपस्थित होते.
यापूर्वी नगराध्यक्ष गटाकडे चार नगरसेवक होते आणि विरोधात १२ नगरसेवक होते. त्यामुळे यावेळी ही उपनगराध्यक्ष पद हे अध्यक्षांच्या विरोधातील गटाकडे जाणार ही चिन्हे होती परंतु राजकारणात प्रत्येक वेळी चानक्षाता दाखवणाऱ्या सौ कऱ्हाडकर यांनी यावेळीही. विरोधी गटाला धोबी पछड करीत त्यांचे चार नगरसेवक फोडत पुन्हा ऐकदा उपाध्यक्षपद ही आपल्याकडेच राखले.
नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विनोद बिरांमणे यांच्या निवडीने त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. पालिका सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ कऱ्हाडकर यांनी सांगितले शहर विकासासाठी आम्ही आमची सर्व ताकद पणाला लावणार आहोत तर नवनिर्वाचित उपाध्यक्ष विनोद बिरमणे यांनी सांगितले सौ करहाडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासाचा कार्यक्रम राबवणार असून सहकार्यानी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.