सोमेश्वरनगर – बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर व मंदिर परिसर महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वर शिवलिंग दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या तर …”हर हर महादेव ” च्या गजरात या दिवशी भाविक विविध जिल्ह्यातून करंजे येथील सोमेश्वर शिवलिंग चे दर्शन घेण्यासाठ हजारोंच्या संख्येत आले होते.. अशी माहिती देवस्थान ट्रस्ट सचिव राहुल भांडवलकर यांनी दिली.
महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वर शिवलिंग गाभारा द्राक्ष व विविध फळांनी सजला होता तर मंदिर गाभारा व मंदिर परिसरात आकर्षक पुष्प सजावट स्वयंभू पतसंस्था सोरटेवाडी यांच्यामार्फत करण्यात आली होती .
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात मिठाईवाले खेळणे पाळणे तसेच गृह उपयोगी विविध वस्तूंचे आकर्षक स्टॉल , हॉटेल, रसवंती गृहदुकाने लागली असल्याने मंदिर परिसर गजबजुन जात सोमेश्वर पंचक्रोशीतील महिला, बालगोपालांनी महाशिवरातत्रेचा आनंद लुटला .
,वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपूल दूरक्षेत्र पोलीस निरीक्षक योगेश शेलार यांच्या मार्फत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
विविध जिल्ह्यातून ५० हजारांच्या वर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती अध्यक्ष प्रताप भांडवलकर यांनी दिली.