10 फेब्रुवारीपर्यंत मुदत; पुरवठा विभागाकडून कार्यवाही सुरू
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय अन्न योजनेतील (रेशनकार्डवर धान्य मिळणारे) या सर्व लाभार्थ्यांचे आधार अध्यावतीकरण व कुटुंबातील किमान एक व्यक्तींचा मोबाईल नंबर नोंदणी करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यासाठी ३२ जानेवारीची मुदत दिली होती. मात्र ती वाढवून आता १० फेब्रुवारी अशी करण्यात आली आहे.
रेशनकार्ड वर ऑनलाईन आधार फीडिंग व मोबाइल क्रमांकाची नोंद सर्व रास्त भाव दुकानदार यांच्याकडील पॉज मशीनवर करता येणार आहेत. यासाठी लाभार्थी यांनी त्यांचे आधारकार्ड घेऊन रास्त भाव दुकानदार यांच्याकडे जाणे आवश्यक आहे. जे लाभार्थी त्यांचे आधार क्रमांक संबंधित रास्त भाव दुकानदार यांच्याकडे शिल्लक सदस्यांचे आधार क्रमांक जमा करणार नाहीत, त्यांचे रेशन बंद करण्यात येणार आहे. आधाराला रेशनकार्ड लिंक करण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. यानंतर रेशनधान्य देण्यात येणार नाही.
याची नोंद सर्व शिधापत्रिकाधारकांनी घ्यावी असे आव्हान पुरवठा निरीक्षक गोपाल वसू यांनी केले आहे.
पुरवठा विभागाकडून रेशनकार्ड आधार लिंक करण्याची कार्यवाही सुरू आहे. रेशनधान्य योग्य व पात्र लाभार्थी पर्यंत पोहोचावे यासाठी आधारकार्ड रेशनकार्डला लिंक करण्यात येत आहे.