महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : (लोणीभापकर)
बारामती तालुक्यातील चोपडज या गावामध्ये जिल्हा वार्षिक (विशेष घटक) योजनेअंतर्गत सन २०१७ – १८ साली व्यायामशाळा बांधकाम मंजूर झालेले या कामाला पाच लाख रुपये मंजूर झालेले. कामाचे टेंडर दि. ३ मार्च २०१९ ला झालेले होते,तरी काम सुरु झालेले नव्हते त्याची मुदत सहा महिने असताना सुध्दा हे काम पूर्ण केले नसल्याने चोपडज येथील भारतीय बौद्ध महासभा तालुका सरंक्षण प्रमुख उमेश निवृत्ती गायकवाड यानी दि. १० जुलै २०२० रोजी चोपडज ग्रामपंचायतीला पत्र दिले होते.
या पत्राची दखल घेऊन ठेकेदार यांचे डिपॉजीट व ठेकेदार परवाना रद्द करण्यात यावा असे पत्र बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर यानी नुकतेच दिले आहे या कामाबाबत कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंचायत समिती बारामती कार्यलयाला कळविण्यात यावा व कार्यवाहीबद्द्ल टाळाटाळ करण्यात येऊ नये असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे






























