नवारस्ता : नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली लेक लाडकी अभियानच्या माध्यमातून पाटण मधील गोरगरीब, फिरस्ते, कातकरी लोकांना जीवनावश्यक वस्तू, महिलांसाठी सॅनीटरी नॅपकीन आदी वस्तूंचे वाटप करून या संकट काळात मदत करून माणुसकीचा हात दिला आहे.
मौजे आंबेघर व ढोकावळे मिरगाव याठिकाणी अतिवृष्टीने भूसख्खलन होऊन जीवित व वित्त हानी झाली. याच बरोबर पाटण तालुक्यात इतर ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे होती त्यावेळेस सुद्धा अशा डोंगर वस्त्यावरील या भागात लेक लाडकी अभियान च्या माध्यमातून बाधित लोकांना जीवनावश्यक वस्तू, चादरी, चटई, महिलांसाठी सॅनीटरी नॅपकीन आदी वस्तूंचे वाटप करून या संकट काळात मदत करून माणुसकीचा हात दिला होता. आम्ही तुमच्यासोबत आहोत काळजी करू नका असा धीर लेक लाडकी अभियान च्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी सुद्धा पाटण मधील गोरगरीब, फिरस्ते, व कातकरी समाजातील लोकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून एक चांगला उपक्रम राबविला जात असून त्याचे कौतुक केले जात आहे. यावेळी लेक लाडकी अभियानचे सदस्य जनार्दन पवार, लालासाहेब वीर यांची उपस्थित होते.
लेक लाडकी सामाजिक उपक्रम घेवून लोकांना मदत करण्यात नेहमीच अग्रेसर असते. लेक लाडकी अभियान व वर्षाताई देशपांडे यांच्या माध्यमातून भूकंपग्रस्तांना मदत असो की, सामाजिक जाणीवेतून महिलांचे नाव सातबाऱ्यावर लावणे असो, यात लेक लाडकी अभियान च्या माध्यमातून नेहमीच लोकांना मदत केली जाते. पाटण तालुक्यात गेल्या काही दिवसात पावसाने अक्षरश धुमाकूळ घातला होता. पाटण तालुक्यात झालेल्या या जोरदार पावसाने डोंगर खचून मोठ्या प्रमाणात भूसख्खलन झाले अनेक झाडे उन्मळून पडली.