शहराचे लोण आत्ता ग्रामीण भागातही, कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव : कुटुंबासाठी काळजी घेण्याची गरज
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :पिंपोडे बुद्रुक
सुरुवातीला हजारोंच्या संख्येने रुग्ण बाधीत आढळयाचे तेंव्हा मुंबई,पुणे व इतर शहरांची एकच चर्चा सुरु असायची,मात्र आत्ता ग्रामीण भागांत प्रत्येक गावांत दररोज एक दोन पेशंट सापडू लागले आहेत.कोरोना संसर्गातून बरे होण्याचे प्रमाण अधिक असले तरीही दररोजच्या वाढत्या संख्येची चिंता आणि भय गडद होत चालले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असतांना नागरिक बिनधास्तपणे फिरतांना दिसत आहेत.ज्यावेळी एकही पेशंट नव्हता तेंव्हा लॉकडाऊनच्या काळात सर्वांनीच अती कडक खबरदारी घेतली.
मात्र गावोगावी पेशंट सापडत असतांना,नागरिक काळजी घेतांना दिसून येत नाहीत.त्यामुळेच समूहाची साखळी वाढून बाधीताची संख्या वाढत चालली आहे.रुग्णांची संख्या जास्त त्या पट्टीने उपचार मिळत नसल्याने अनेकांचे जीव जात आहेत.यामध्ये आपल्या जवळचे नातेवाईक,मित्र, ओळखीचे लोक कोरोना महाभयंकर आजाराने आपल्या पासून हिरावून नेहली.त्यामुळे नागरिकांनो हातातरी शहाणे होऊन,विनाकारण बाहेर पडू नका.स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या.विनाकारण गर्दी करु नका,कामानिमित्त बाहेर गेलाच तर मास्क व सेनिटायझरचा वापर करा.नियमाचे पालन करा,महत्वाचे म्हणजे आपण बाहेर पडल्यानंतर आपले कोणीतरी घरी आहे हे लक्ष्यात ठेवा आणि याचे भान ठेऊन तसे वागा.
मार्च एप्रिल या महिन्यात आपण कोरोनाची सोशल मिडीयावरुन चर्चा व दृश्य पाहत होतो.त्यावेळी चीन,रशिया,फ्रास, स्पेन या देशातील रुग्णांची परस्थिती पाहून आवाक होत होतो.अशी परस्थिती इकडे येऊ नये याकरिता देवाला प्रार्थना करतं होतो.मात्र या संसर्ग रोगाने आत्ता जगभरात फैलाव केला आहे,आणि त्यात आपण भरडलो आहे.सुरुवातीला इतर देशात,नंतर आपल्या देशात,राज्यात,शहरात,जिल्हयात,तालुक्यात आणि आत्ता गावागावांत वाड्यावस्त्यांवर आणि आत्ता घरात घरात पोहचण्याची वेळ आली आहे.या महाभयंकर रोगाने जवळच्या लोकांच्या जीवावर बेतण्याचा प्रसंग वाढू लागले आहेत.
कोरोना श्रीमंत व गरीब पाहत नाही.समुह संसर्गाने साखळी वाढत आहे, रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे.यामध्ये बाधिताना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने,व वेळेत उपचार होत नसल्याने कोरोनाने अनेकांना जीव गमवावा लागतं आहे. घरा बाहेर जाणाऱ्यांनी आपले कुटुंब आहे,पती,लहान मुले,आई, वडील आपली घरी वाट पाहत आहेत.हे लक्ष्यात ठेऊन बाहेर पडले पाहिजे. कोरोना कोणाच्या रूपाने येऊन, तुम्हांला बाधित करेल याचा नेम नाही,आणि याची खात्री सुध्दा कोणीही देऊ शकत नाही.त्यामुळे सावध राहून खबरदारी घेणे एवढाच पर्याय आहे.कारण कर्त्या व्यक्तीला काही झाले तर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाने काय करायचे.याचे भान सर्वांना असले पाहिजे.त्यांच्यावर काय वेळ येईल,याचा विचार करा.कामा व्यक्तिरिक्त बाहेर पडू नका,मोकार गर्दी करुन,नाहक गप्पा गोष्टी टाळा,नुसत्याच्या पैशाच्या मागे धावू नका,महत्वाचे काम असेल तरंच बाहेर पडा, काळजी घ्या,सुरक्षित राहा. कोरोना आज आहे,उद्या जाईल मात्र तुम्हींच नाही राहिला तर कुटुंबाची काय अवस्था होईल याचा विचार करुन बाहेर पडा. आरोग्याचे प्रश्न भेडसावत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, थोडक्यात असतांना वेळेत उपचार घ्या.विनाकारण बाहेर पडतांना विचार करा