पाटण /प्रतिनिधी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून यामुळे कोयना धरणाच्या शिवाजीसागर जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. धरणातील पाणीसाठ्याची पंच्याहत्तरीकडे वाटचाल सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून कोयना धरण पाणलोट परिसराला जोरदार पावसाने चांगलेच झोडपून काढत ब-याच दिवसांची कसर भरून काढली,धरणांर्तगत येणाऱ्या महाबळेश्वर, बामणोली, नवजा, कोयना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला यामुळे जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक सरासरी सुमारे १२२७७८ क्युसेक्स ईतकी वाढली होती, दरम्यान पाण्याची आवक प्रचंड वाढल्याने धरण लवकरच भरेल आशी आशा निर्माण झाली होती मात्र गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला असल्याने यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली असुन सध्या धरणात ३२५९१ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. तर शनिवारी सायंकाळ पर्यंत धरणातील पाणीसाठा ७२.२२ टिएमसी झाला आहे.
कोयना धरण दिनांक ८आॅगस्ट २०२० रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतची आकडेवारी, मागील वर्षी यावषीॅ दि. ८/८/२०१९ दि. ८/८/२०२० *पाणीपातळी २१६१,”६” फुट २१३१”८” फुट *पाणीसाठा १०२.६६ टिएमसी ७१.५५ टिएमसी *एकूण आवक* १२९.१९ टिएमसी ५४.९६ टिएमसी *टक्केवारी* ९४% ६८.७०% *सरासरी आवक* 125000 क्युसेक्स , ३२५९१ क्युसेक्स * विसर्ग*104000 क्युसेक्स 00 क्युसेक्स
*एकूण पाऊस मिलीमीटर मध्ये * *कोयना – ४९११ २६५५* नवजा – ५६१४ २९०३*महाबळेश्वर -५०६८ २८१
सध्या कोणत्याही प्रकारे धरणातून विसर्ग सोडण्याचे नियोजन नाही .तरी धरण परिचालन सूची (ROS) नुसारच पाण्याचा साठा व आवक विचारात घेऊन धरणातून विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल . विसर्ग सोडण्या पूर्वी सर्वाना पूर्व कल्पना देऊनच सोडला जातो . सध्या कोयना धरणात मागील काही दिवसांच्या तुलनेत पाण्याची आवक कमी आहे. तरी कृपया कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
श्री. कुमार पाटील कार्यकारी अभियंताकोयना सिंचन विभाग कोयनानगर,