“ओझं”दिसत..कारण ते लादलेलं असतं..”जबाबदारी”दिसत नाही..कारण….ती स्विकारलेली असते….” महाड येथील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेवेळी प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक जबाबदारीच्या कर्तव्य भावनेतून मदत कार्य केलेल्या महाबळेश्वर ट्रेकर्सचे अध्यक्ष अनिल केळगणे,नगरसेवक कुमार शिंदे,सुनिलबाबा भाटिया तसेच महाबळेश्वर पालिकेचे नगरसेवक कुमार शिंदे व अग्निशामक दलाचे जवान – पवार काका,संतोष बिरामणे यांचा राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म,पर्यटन,फलोत्पादन,क्रीडा व युवक कल्याण,राजशिष्टाचार,माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला
जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील,अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ आदी उपस्थित होते























