महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कराड नगरपरिषद कराड
मुख्य अधिकारी रमाकांत डाके यांना प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले त्या निवेदनामध्ये दिव्यांग बांधवांचा निधी नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायती पाच टक्के निधी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने रोखण्यात आलेला आहे तो आदेश दिव्यांग बांधवान साठी अन्यायकारक आहे व त्यांच्या हक्कावर आहे
सन 2022 ते 2023 सालचा 5% दिव्यांग कल्याण निधी हा दिले जातो तो थांबवल्याने दिव्यांग बांधवांचे औषध मेडिकलचा खर्च त्यातून भागला जातो तसेच काय काय दिव्यांग बांधवांचा त्यावर उदरनिर्वाह होतो अशा परिस्थितीत दिव्यांग बांधवांचा निधी थांबवणे म्हणजे त्यांच्यावर केलेला एक प्रकारे अन्यायच असून याचा पुनर्विचार व्हावा निदान दिवाळी असल्याकारणाने अर्ध निधी वाटप व्हावा म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे कराड तालुका अध्यक्ष सतीश पाटील यांनी निवेदन देण्यात आले उपस्थितीत दिव्यांग बांधव अनिल यादव शुभम गवळी राजू टकळे राजू पालकर ओसवाल काका राजू संदल मलिक असंख्य दिव्यांग बंधू उपस्थित होते