महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार:
साखरवाडी ता फलटण येथील श्री दत्त इंडिया कारखान्याच्या नवीन उभारलेल्या डिस्टलरीचे(अर्कशाळा)चे उदघाटन व नवीन पी पी पॅकेज बॅग कारखान्याचे भूमिपूजन विधान परिषदेचे सभापती ना रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कारखानास्थळावर शासनाचे कोरोना संकर्मनाचे सर्व नियम पाळून अतिशय साध्या व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडले या वेळी विधान परिषदेचे सभापती नामदार रामराजे नाईक निंबाळकर फलटणचे महंत श्यामसुंदर शास्त्री, श्री दत्त इंडियाचे संचालक जितेंद्र धारु, चैतन्य धारू, परीक्षेत रूपारेल, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे तसेच व्हाईस चेअरमन नितीन शाहूराजे भोसले, महानंदा डेअरी चे व्हाईस चेअरमन डी के पवार पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर , श्रीदत्त इंडिया कंपनीचे प्रशासकीय अधिकारी अजित जगताप, सिव्हील इन्चार्ज राजाभाऊ भोसले डिस्टलरीचे जनरल मॅनेजर राहुल टिळेकर,प्रोसेस मॅनेजर विजय जगताप, शेतकी विभागाचे अधिकारी सदानंद पाटील, सुरक्षा अधिकारी अजय कदम फलटण तालुका साखर कामगार युनियनचे पोपट भोसले गोरख भोसले, संजय जाधव,ग्रामपंचायत सदस्य मचिंद्र भोसले,तंटामुक्ती अध्यक्ष महेश भोसले,एच आर ऋतुराज पाटील, युनिटी बिल्टेक चे नाईक निंबाळकर व कर्मचारी उपस्थित होते