पोषण अभियानात कामामध्ये सातत्य ठेवावे : विनय गौडा
महाराष्ट्र न्यूज /सातारा दि. 3 : राष्ट्रीय पोषण अभियाना अंतर्गत 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सातारा अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत सर्व सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत सप्टेंबर 2021 राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.उदय कबुले म्हणाले की, सातारा जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट काम करावे व जिल्ह्यातील सर्व कुटुंबापर्यंत पोहोचावे आणि योग्य पोषणाचा अर्थ सर्वसामान्यांना समजून सांगावा असे आवाहन केले. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विनय गौडा यांनी राष्ट्रीय पोषण अभियानामध्ये सातारा जिल्ह्याने यापूर्वी चांगले काम केलेले आहे तसेच या वर्षी देखील आपण पोषण अभियानची सुरुवात चांगली केलेली आहे. त्यामध्ये सातत्य ठेवावे याबाबत सूचना व मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप विधाते, अर्थ व क्रीडा क्रीडा समिती सभापती मा.श्री मानसिंगराव जगदाळे, समाज कल्याण समिती सभापती मा.सौ.कल्पना खाडे तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती मा.सौ.सोनाली ताई पोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाक सौ.रोहिणी ढवळे, श्री.दीपक ढेपे तसेच सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या उपस्थितीत होत्या. कोविड चे नियम पालन करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
महाराष्ट्राची भावी पिढी सुदृढ निरोगी व बुद्धिमान होण्यासाठी व राज्यातील कुपोषण निर्मूलनासाठी शासन विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये विविध उपक्रमांचे नियोजन संपूर्ण जिल्ह्यामध्ये करण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने किशोरी मुली गर्भवती महिला स्तनदा माता व 0 ते 6 वयोगटातील गटातील बालके या घटकांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये घरापर्यंत गृहभेटीच्या माध्यमातून आरोग्य, पोषण, आहार व स्वच्छते बाबत जनजागृती व मार्गदर्शन अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच इतर सहभागी विभाग, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, नगर विकास यांच्याशी समन्वय साधून महिला व बाल विकास विभाग नोडल विभाग म्हणून काम करणार आहे. यामध्ये पोषण अभियानाची खालील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत .
1) 0 ते 6 वयोगटातील बालकांमधील बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे.
2) 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे.
3) 6 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांमधील ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे.
4) 15 ते 49 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली व महिलांना मधील रक्ताचे प्रमाण कमी करणे.
5) जन्मतः कमी वजन असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी करणे.
वरील उद्दिष्टे साध्य करण्याकरिता 5 घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. त्यामध्ये बालकाचे पहीले 1000 दिवस, ॲनिमिया, अतिसार, हात धुणे वैयक्तिक स्वच्छता व वैविध्यपूर्ण पौष्टिक आहार यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ.रोहिणी ढवळे यांनी केले याप्रसंगी अध्यक्ष श्री.उदय कबुले यांनी अंगणवाडी सेविकांनी कोविड काळामध्ये सर्वेक्षणाचे कामकाज संभाळून त्यांचे मूळ कामकाज देखील प्रामाणिकपणे पार पाडत आहेत याबद्दल सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले व सातारा जिल्ह्याने पोषण अभियानामध्ये चांगले काम करावे असे आवाहन केले .यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विनय गौडा यांनी सातारा जिल्ह्याने यापूर्वी पोषण अभियान मध्ये चांगले कामकाज केलेले आहे. तसेच या वर्षी देखील पोषण अभियान ची सुरुवात चांगली केली आहे. तरी कामामध्ये सातत्य ठेवण्याच्या सूचना केल्या. सभापती महिला व बालकल्याण समिती सौ.सोनाली ताई पोळ यांनी या कालावधीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये पारंपारिक काळामध्ये ज्याप्रमाणे गर्भवती महिला, स्तनदा माता व लहान मुलांची काळजी ज्याप्रमाणे घेतली जात होती त्याच प्रमाणे आता देखील काळजी घेतली जावी यासाठी पोषण अभियानाच्या माध्यमातून जनजागृती व मार्गदर्शन करावे असे आवाहन केले. या वर्षी सप्टेंबर 2021 राष्ट्रीय पोषण महिन्यामध्ये शासनाने 4 महत्त्वाच्या घटकाकडे लक्ष देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या प्रमाणे उद्घाटन कार्यक्रमावेळी आदर्श पोषण गाव, पोषण वाटिका, पोषणासाठी योगा व आयुष तसेच पोषण रांगोळी गंभीर तीव्र कुपोषण ओळख, आहार मार्गदर्शन व संदर्भसेवा यांचे रांगोळी स्वरूपात व फलकांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात आली तसेच बाळाचे सोनेरी पहिले 1000 दिवस या पोस्टर चे अनावरण तसेच पोषण फलकाचे उद्घाटन व पोषण प्रतिज्ञा स्वाक्षरी मोहीम घेऊन उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन सौ.वृंदा शिवदे पर्यवेक्षिका व उपस्थितांप्रति आभार प्रदर्शन किरण उदमले बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले
सही पोषण देश रोशन




















