महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(मायणी):मंगेश भिसे
कोरोना विषाणू ला रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून सर्वे करणाऱ्या आशा सेविका / अंगणवाडी सेविका यांचे मानधन ,कोरोना सुरक्षा साहित्याचा अपुरा पुरवठा यासह इतर प्रलंबित प्रश्नी राजे प्रतिष्ठाण खटाव तालुकाचे कार्याध्यक्ष विशाल आप्पासो चव्हाण यांनी तालुका प्रशासनास निवेदना मार्फत आशासेविकांच्या प्रश्नांची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे . प्रशासनाच्या वतीने गाव कामगार तलाठी शंकर चाटे यांनी हे निवेदन स्वीकारले .

निवेदनात असे म्हंटले आहे की, महाराष्ट्रात पसरत चालेल्या कोरोना विषाणूचा अटकाव करण्यासाठी गाव पातळीवर लोकप्रतिनिधी पासून ते सामान्य लोकांमध्ये सहभागी असलेले आशा स्वयंसेविका , अंगणवाडी सेविका , मदतनीस या घरोघरी जावून जनजागृती करणे , आजारी असेल तर मधुमेह , उच्च रक्तदाब , वृध्द लोकांची संख्या , ताप , खोकला , सर्दी असल्यास माहीती घेवून प्राथमिक आरोग्य केंद्रास माहीती सादर करणे अशी कामे जीवाची पर्वा न करता करीत असून त्यांना अदयाप त्यांच्या कामाच्या योग्यते नुसार मानधन कमी प्रमाणात मिळत आहे.
सध्या शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना चालु केली असून यामध्ये टेम्परेचर गण , ऑक्सीमीटर , मास्क , क्लोज , या सर्व सुविधा आवश्यक इतक्या उपलब्ध नसून उपलब्ध साहित्यावर आज त्या समाज रक्षण काम करीत आहेत . आजच्या कोरोना परस्थितीची भयानक स्थिती पाहता आशा सेविकांना कोणतेही आरोग्य रक्षणाची साधने दिली जात नसून या सर्व बाबींची पुर्तता करुन कोरोना चा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रशासनाने व आरोग्य विभागाने या कोरोना योध्दाची दखल घेवून हा कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा या पुरवाव्यात.
सध्या उपलब्ध साहित्य व मायणी भागाची लोकसंख्या पाहता ,मानधना सोबत मिळणारी वाढ याची अध्याप पूर्तता झाली नसून मिळणाऱ्या कमी मानधनात आशा सेविका आपले काम करीत आहेत परंतु कोरोना ची वाढती संख्या पाहता घरोघरी जाऊन प्रत्येक्ष लोकांची विचारपूस करून माहिती घेणाऱ्या या सेविकांना सुरक्षा साहित्य व तपासणी किट आवश्यकते प्रमाणे मिळणे गरजेचे आहे अन्यथा या आशा स्वयंसेविका आपले काम थांबवू शकतात .
‘ रक्षिली जनता तर होतील अनेक निवडणुका’
आज ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही योजना सर्वत्र सुरू असून या मध्ये डॉक्टर,आशा सेविका ,गावातील १० स्वयंसेवक अशी टीम हे कार्य पार पडणार आहेत. मायणीतील काम स्वयंसेवक उपलब्ध नसणे व आशासेविकांचे अनेक प्रश्न यामुळे रेंगाळले असून या कामास गती देण्यासाठी मायणी गावाची लोकसंख्या पाहता याठिकाणी निवडणूक लढवणारे विजयी व पराजित असे ३४ सदस्य आज खऱ्या अर्थाने एकदिलाने जनसेवेत उतरले तर लोकांच्यातील भीतीचे वातावरण कमी होऊन या उपक्रमास लोक उस्फुर्त सहभाग नोंदवतील.कारण ‘रक्षिली जनता तर होतील अनेक निवडणुका’ : विशाल चव्हाण कार्याध्यक्ष ,राजे प्रतिष्ठान खटाव तालुका.




















