फलटण : आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ रस्ता रुंदीकारण करताना बाधित होणाऱ्या निवासी कुटुंबांना दोन गुंठे भूखंड व रमाई आवास योजनेचे घर देऊन पुनर्वसन करावे अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या वतीने करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ लगत वसलेली अनुसूचित जाती प्रवर्गातील मातंग लोक वस्ती रस्ता रुंदीत बाधीत होत असल्याने सदर कुटुंबियांना आर्थिक मोबदला न देता शासकीय गायरानावर किंवा वाढीव गावठाण निर्माण करून प्रत्येक कुटुंबास मोफत दोन गुंठे भूखंड देऊन प्रत्येक कुटुंबासाठी माता रमाई आवास योजनेचा घरकुल देऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वसाहत नाव देऊन त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना केली.
यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणले की, आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवरील रस्ता रुंदी बाधित कुटुंबियांना न्याय देवू. तसेच विशेष लक्ष घालून कारवाई करू असे आश्वासन राव यांनी दिले. त्याच बरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सातारचे जिल्हा अधिकारी शेखर सिंह यांच्याशी सौरभ राव यांनी संवाद साधला.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी सुरेखा भालेराव, सुनील भिसे, संतोष कदम, वसंत वावरे आणि बाधित कुटुंबे आनंदा खुडे, बाबुराव खुडे, दिनकर खुडे, बबन आवारे, संपत खुडे, चंपा कुडे ,रामचंद्र खुडे, मल्हारी खुडे, महादू खुडे, संजय खुडे, दादू खुडे इत्यादी उपस्थित होते.