दहिवडी : ता.२८
माढा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात कोणत्याही कार्यकर्त्यांनी संभ्रम न बाळगता आजपासून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारास कार्यकर्त्यांनी जोमाने सुरुवात करण्याचे आवाहन शेखर गोरे यांनी केले आहे. तसेच विरोधकांनाही आमचे आवाहन आहे कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रम तयार करू नये, नको त्या भानगडी करू नये, आपापल्या उमेदवाराचे काम करावे, आम्ही महाविकास आघाडीच्या घटक पक्षात असून आम्ही अधिकृत उमेदवारच्या बरोबर आहे व असणार. काही कारणास्तव कालच्या मेळाव्याला आम्हाला येता आले नाही परंतु काही दिवसात आम्ही स्वत: ताकतीने मेळावा घेणार आहे.अशी माहिती शेखर गोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.