पाटण : केवळ वृक्षारोपण करून थांबणार नाही तर सातत्याने या झाडांची देखभाल करून संवर्धन करणार आहोत. जेणेकरून या परिसरात विविध प्रकारचे पशुपक्षी येतील मुबलक प्रमाणात ऑक्सिजन निर्माण होईल व पर्यावरण चा समतोल साधला जाईल. असे मत कमलेश्वरी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे संस्थापक यशवंतराव जगताप यांनी पाटण व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूल च्या परिसरात वृक्षारोपण करताना व्यक्त केला.
यावेळी पाटण व्हॅलीचे प्राचार्य नितेश नाडे, मनोहर यादव, पत्रकार शंकरराव मोहिते, मंगेश पाटणकर, कुमार राजेशिर्के, श्रीलेश जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूल च्या परिसरात आवळा पेरू फणस आंबा पिंपळ आदी फळ झाडांच्या रोपांची लागवड कमलेश्वरी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने करण्यात आली. हेमंतकुमार राजेशिर्के, सुरेश लाड, रोहित गिजरे, संदेश बनसोडे, अमोल खैरमोडे, किशोर कवडे, संजय दाभाडे, दिनकर कांबळे, बनाजी नायकवडी उपस्थित होते.