कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे केले आवाहन
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी ( इंदापूर) : शहाजीराजे भोसले
वालचंदनगर येथील लालचंद हिराचंद मेडिकल सेंटरमध्ये कोरोना केअर सेंटरचे उदघाटन श्रीमान शेठ चिराग दोशी ,एम.डी.सी.ई.ओ.वालचंदनगर इंडस्ट्रीज लि.वालचंदनगर यांच्या शुभहस्ते व राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तात्रय (मामा) भरणे , पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . यावेळी नामदार भरणे मामा यांनी उद्योगमहर्षी श्रीमान शेठ लालचंद हिराचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले . तसेच कोरोना संकटाच्या काळात आपल्या स्वमालकीचे हाॅस्पिटल उद्योगपती श्रीमान शेठ चिराग दोशी यांचे नामदार श्री भरणे मामा यांनी विशेष आभार मानले .
यावेळी भरणे यांनी माझ्यावरती कोणीही कितीही टीका केली तरी कोरोना संकट जोपर्यंत जात नाही , तोपर्यंत सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव जनसेवक म्हणून काम करत रहाणार असल्याचे सांगितले . यावेळी नामदार भरणे मामा यांनी आरोग्य विभाग , पोलीस प्रशासन , म्हसुल प्रशासन यांची संयुक्तरित्या आढावा बैठक घेतली . उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना कोरोना सेंटरमधील रूग्णांना सकाळी मिळणारा नाष्टा व जेवण उत्तम प्रकारचे मिळावे तसेच गरम पाणी , वाफ , कोरोना सेंटरमधील स्वच्छता राखण्यासंर्दभात विशेष लक्ष देण्यास सांगून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सत्य माहिती सांगावी , तसेच इंदापूर तालुक्यातील १६ गावांमधील सर्व्हे पूर्ण झाला असून उर्वरित गावांचा सर्व्हे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी दिल्या .
पोलीस प्रशासनाने मास्क न वापरण्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी नामदार भरणे मामा यांनी देऊन कोरोना संकटाच्या काळात आशा स्वयंसेविका ताईंनी दिलेले योगदान हे अविस्मरणीय असल्याचे सांगत त्यांच्या कामाचे कौतुक करत भविष्यात माझ्या तालूक्यातील आशा स्वयंसेविका ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले .
या कार्यक्रमाच्या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील , जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशालीताई प्रतापराव पाटील , प्रांताधिकारी दादासो कांबळे , छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे , पंचायत समिती सदस्या शैलजाताई फडतरे , सारिकाताई लोंढे , तहसिलदार सोनाली मेटकरी , तालूका आरोग्य अधिकारी डॉ गावडे , गटविकास अधिकारी विजयकुमार परीट साहेब , पोलीस अधिकारी नारायण सारंगकर , दिलिप पवार साहेब , जिवन माने साहेब , वालचंदनगर इंडस्ट्रीजचे फॅक्टरी मॅनेजर शुक्ला साहेब , धिरज केसकर साहेब यांच्यासह वालचंदनगर , कळंब , रणगांव , चिखली , निमसाखर परिसरातील ग्रामस्थ , महिला व युवकवर्ग यावेळी उपस्थित होते