उंब्रज प्रतिनिधी:- पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुयाचिवाडी तालुका कराड गावाच्या हद्दीत सातार कडून कराड दिशेने जाणाऱ्या लेंथ वर दुधाच्या टँकरच्या धडकेने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली असून टँकरच्या ड्रायव्हरने घटनास्थळ पलायन केले आहे.
दरम्यान घटनास्थळी वरून मिळालेली माहिती अशी युनिकॉर्न गाडी क्रमांक MH50R7711या गाडीस अन्यात वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकल चालक समाधान गंडू कांबळे वय 42, मूळ गाव सोलापूर सध्या राहणार उंब्रज ता कराड याचा जागीच मृत्यू झाला समाधान कांबळे हे अपशिंगे तालुका सातारा येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते.घटना स्थळीउंब्रज पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले असून अपघाता विषयी माहिती घेण्याचे काम चालू होते































