महाराष्ट्र न्यूज मसूर प्रतिनिधी :
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबुराव पाटील किवळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील श्रीकृष्ण मेडिकल व ओंकार सर्जीमेड कराड यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील यांच्या प्रयत्नाने गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन मशीन उपलब्ध करण्यात आले. त्याचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
उपसरपंच विजयसिंह जगदाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ रमेश लोखंडे, मसूर मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ शरद काळे, प्रतिनिधी दिलावर सुतार, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल जगदीश पुरोहित, अध्यक्षा जान्हवी पुरोहित, सचिव सुजाता पाटील, ग्रामपंचायत सदस्या निलोफर मोमीन, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा सहसंघटक प्राचार्य विक्रम शिंदे, तालुकाध्यक्ष गजानन गिरी, गोविंदराव जगदाळे, प्रकाश पाटील,सतीश पाटील, ओंकार पाटील उपस्थित होते.कोरोनाचा वाढता संसर्ग चिंताजनक आहे. गरजू रुग्णांसाठी ऑक्सीजन मशीनची उपलब्धता श्रीकृष्ण मेडिकल व ओंकार सर्जिमेडच्यावतीने स्वातंत्र्यसैनिक बाबुराव पाटील किवळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ करून जनसेवेचे वृत्त स्वीकारले आहे हे स्तुत्य आहे. गरजूंनी मशीनचा लाभ घ्यावा असे मानसिंगराव जगदाळे यांनी संगितले. दिलीप पाटील यांनी स्वागत केले.प्रकाश पाटील यांनी आभार मानले.




















