
टाळी आणि मृदुंगाच्या तालावर हे नृत्य करत असताना नटराज ज्याप्रमाणे आपले भान आपण भान हरपून नृत्य करतात त्याचे सादरीकरण यामध्ये झाले. त्यानंतर रंगाजली सादर झाली . यामध्ये रंग देवतेला ,अष्टदिशा ,गुरुदेव देवता आणि प्रेक्षक या सर्वांना कडून आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी नर्तिका पुष्पांजली अर्पण करतात आणि शेवट या नृत्यांगना शंकराची जयजयकार करत स्तुती करतात असे हे नृत्य पार्वती सोबत शंकराने सादर केले होते, त्याचे सादरीकरण करण्यात आले.शंकराचे ..भो शंभो ..हे नृत्य होऊन फुलांच्या पाकळ्या प्रमाणे उलगडत जाणाऱ्या ..आलरीपू ला सादर करत.. कोललू उडी मानम.. हे एक अनोखे पद सादर झाले. त्यानंतर मैसूर जती हा शास्त्रीय नृत्य प्रकार सादर होऊन कथक नृत्य सादर केले . देवी स्तुति सादर होत ..आंबावलम ..हे वर्णन या शास्त्रीय प्रकारातील नृत्य सादर झाले .अंबावलम हे तमिळ भाषेतील शिवशंकराचे नाव आहे. यात नटराज शिव कामिनी अर्थात पार्वतीदेवी बरोबर आनंद तांडव करीत आहे .यात तांडवाचे सात प्रकार आहेत याचे वर्णन या नृत्यातून कलाकारांनी उपस्थितांना घडविले. त्यानंतर तिल्लाना सादर होत मंगलमय या कार्यक्रमाची सांगता झाली.
या नृत्य कार्यक्रमात आचल आणि अपूर्वा ने सादर केलेली देवीस्तुती आणि ..भो शंभो.. यांना त्यांना विशेष प्रतिसाद मिळाला .उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात नृत्य कलाकारांना दाद दिली .या नृत्य कार्यक्रमांमध्ये आचल घोरपडे, उर्वी
गायकवाड ,काव्या खामकर ,अनन्या पोतदार ,आकांक्षा कणसे, आरती साळुंखे, प्रज्ञा पाटोळे ,सई
पोरे, अपूर्वा कणसे, मानसी सदामते ,रीचा त्यागी यांनी सहभाग घेतला होता. याच कार्यक्रमात मानसी सदामते ने सादर केलेले शिव शंकरा वरील कथक नृत्य हे सर्वांनाच विशेष भावले. या गाण्याचे गायन सोनू निगम यांनी केले होते. नृत्य सादरीकरण नंतर या सर्व कलाकारांचा सत्कार नटराज मंदिराच्या वतीने सौ. उषा शानभाग ,सौ. कांचन शहाणे ,सौ. शिंदे यांचे हस्ते करण्यात आला.
दरम्यान महाशिवरात्रिलाच नटराज नृत्य कला शाळेच्या नृत्य सादरीकरणपूर्वी मुंबई येथील गुरु रागिनी चोकसी
यांच्या कलाकारांनी बहारदार भरतनाट्यम सादर केले. या पूर्वार्धात झालेल्या कार्यक्रमात पिंकी शहा ,गुंजन मिश्रा, पूर्विका शिरोळे यांनी सहभाग घेतला होता .या कार्यक्रमांमध्ये मुख्य गायन शिवप्रसाद यांनी केले होते तर सहगायन साथ प्रांजल देशपांडे यांची होती .या कार्यक्रमात श्लोक, शिवपंचाक्षरस्तोत्र ,दशावतार भजन ,नटनं आदिनार ,शिव भजन आणि तिल्लाना हे कार्यक्रम संपन्न झाले. तसेच नटराज मंदिरात महाशिवरात्री च्या पूर्वसंध्येला पुणे येथील गुरु तेजश्री अडीगे यांच्यासह त्यांच्या शिष्य कलाकारांनी भरतनाट्यम चा आणखी एक नृत्य प्रकार सादर केला .व या कार्यक्रमात एकूण आठ पदांवर नृत्य सादर झाली. नटराज नमोस्तुते या शिर्षकाखाली झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित कलाकारांची मोठी दाद मिळाली.



















