आरोग्य केंद्र व वाहतूक पोलिसांच्या मदतीने मोहिमेला सुरुवात
कराड : सातारा जिल्ह्यात तीन दिवसांपेक्षा काल मोठी वाढ झाली असुन तब्बल 242 बाधितांची वाढ चिंता वाढवणारी आहे. प्रशासनाने वाढत्या संसर्गामुळे निर्बधांचे व कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी रेट पाच टक्के पार झाला आहे.दरम्यान कराडच्या कोल्हापूर नाक्यावर नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने विना मास्क फिरणार्या, वाहनचालक, नागरिक यांची कोरोना चाचणी घेण्यास प्रारंभ केला आहे. वाहतूक पोलीस यांच्या मदतीने ही मोहिम आज (दि.7) सुरू करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात बाधितांची मोठी वाढ
काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनूसार जिल्ह्यात 242 बाधितांची (Covid-19 patient) वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्याचा बाधितांचा आकडा 2 लाख 53 हजार 491 एवढा झाला आहे, तर आजपर्यंत 2 लाख 45 हजार 25 जण कोरोनामूक्त झाले तर आज पर्यंत 6 हजार 499 जणांचा मृत्यू (died of COVID-19) झाला आहे. जिल्ह्यात काल 4 हजार 123 नमूने घेण्यात आले तर आजपर्यंत 23 लाख 95 हजार 310 जणांचे नमूने (swab sample) घेण्यात आले आहेत.



































