महाराष्ट्र न्यूज पाटण प्रतिनिधी :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष चंद्रकांत बामणे यांची चर्मकार विकास संघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. चर्मकार विकास संघाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण सातत्यपुर्ण सामाजिक बांधीलकीतून चर्मकार समाजाच्या विकास, सुख दुःख, न्यायहक्क व सन्मानाच्या सर्व स्तरावर कार्यरत आहात.
आपण केलेल्या सर्वांगिण कार्याचा विचार करून यापुढे चर्मकार विकास संघ पाटण तालुका अध्यक्ष या पदावर पुढील आदेशापर्यंत नेमणूक करण्यात येत आहे. आपणास नियुक्ती केलेल्या पदाच्या जबाबदारीपूर्वक, संघटनेच्या ध्येय धोरणानुसार व समाज हिताच्या कामातून योग्य न्याय देऊन यशस्वीपणे कार्य कराल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पत्रावर संघाचे सचिव प्रा. सुभाष चिंघे व प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या स्वाक्षरी आहेत.या निवडीबद्दल बामणे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर व समाजबांधवानी अभिनंदन केले आहे.