महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
कृष्णा हॉस्पिटलमधून आज 27 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत 2100 पेक्षा अधिक रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. कोरोनामुक्तीचा हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वांसाठी ही एक दिलासादायक बाब ठरली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा हॉस्पिटल कोरोनारुग्णांना उपचारासाठी वरदान ठरत असून डॉ सुरेश भोसले डॉ अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगली कामगिरी करीत असून आज आज पर्यंत २१०० कोरोना मुक्त झाले आहेत