पालिकेचा उपक्रम: प्रबोधनाचा वेगळा मार्ग
महाराष्ट्र न्यूज मलकापूर प्रतिनिधी :
मलकापूर येथील पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी प्रबोधनाचा वेगळा मार्ग अवलंबला आहे. शहरात स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुसरून विषयावर आधारित लघुपट, ऑडिओ क्लिप, चित्रकला, निबंध व टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीच्या स्पर्धेत बक्षीस मिळवायचे अशी पालिकेने कंबर कसली आहे.
शहराच्या सध्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत विविध कार्यक्रम जोमात सुरू आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत शहरातील विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योग समूह, खाजगी संस्था, गृहनिर्माण संस्था मार्फत शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध उपक्रम, श्रमदान राबविण्याचे ठरवले आहे. शहरास फाईव्ह स्टार मानांकन, वॉटर प्लस मानांकन तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत पहिल्या पाच मध्ये येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत. विविध विषयावर आधारित लघुपट, ऑडिओ क्लिप ,चित्रकला, निबंध व टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुसरून ‘माझे मलकापूर माझी जबाबदारी’
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१ सहभाग नागरिकांचा’,स्वच्छतेचे महत्व, घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी व शहर सुशोभीकरण हे पाच विषय देण्यात आले आहेत. पालिकेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी प्रबोधनाचा वेगळा मार्ग अवलंबला आहे. या वर्षीच्या स्पर्धेत बक्षीस मिळवायचेच अशी पालिकेने कंबर कसली आहे.