महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/सातारा :
फेसबुकवर टाकलेल्या पोस्टला विरोधात कमेंट देवून त्याद्वारे तुला आता दाखवतो. तुला बघून घेतो, असे म्हणून दमदाटी केल्याप्रकरणी साताऱ्यातील डॉ. संदीप सूर्यकांत काटे (रा.सातारा) यांच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह मॅरेथॉन असोशिएशनमध्ये खळबळ उडाली आहे. सुजित बाळकृष्ण आंबेकर (रा.सातारा) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आंबेकर यांनी त्यांच्या फेसबुकवर अकाउंटवर एक पोस्ट केलेली आहे. या पोस्टवर डॉ. काटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया तक्रारदार आंबेकर यांच्या विरोधात असून त्यामध्ये तुला आता दाखवतो. तुला बघून घेतो, अशी धमकी दिली असल्याचे आंबेकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतचे स्क्रीन शॉट काढून शहर पोलिस ठाणे गाठले. फेसबुकवरील पोस्ट व त्यावर विरोधातील प्रतिक्रियाप्रकरणी तक्रार असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार जगदाळे करत आहेत. दरम्यान, साताऱ्यातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.





















