महाराष्ट्र न्यूज लोणंद प्रतिनिधी : बिलकीस शेख
लोणंद येथील प्रसिद्ध कापड व्यापारी तथा साथ प्रतिष्ठाण चे कार्यकारिणी सदस्य भावेश दोशी यांचे चुलते व मितेश दोशी यांचे वडिल स्व.नवनीतशेठ शांतीलाल दोशी यांच्या 67 व्या जयंतीनिमित्ताने त्यांचे स्मृतिप्रीत्यर्थ लोणंद येथील स्वामी समर्थ कोविड हाॅस्पिटल येथे कोविड 19 ने बाधित रुग्णांसाठी केळी, खजुर व चिक्की पॅकेट्स तसेच 100 मास्क चे वाटप करुन प्रेरणादायी पध्दतीने जयंतीदिन साजरा केला.
गत वर्षी त्यांचे जयंतीनिमित्त पुणे येथील मातोश्री वृद्धाश्रमात धान्य वाटप केले होते.
यावर्षी युवा नेते तेजस क्षीरसागर, साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दिपक बाटे, कार्यकारिणी सदस्य भावेश दोशी यांचे हस्ते मितेश दोशी यांनी सदर साहित्य स्वामी समर्थ हाॅस्पिटल चे नवनाथ साळुंखे व कर्मचारी यांचेकडे स्पुर्द केले.