फलटण : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फलटण नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते माननीय समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आज फलटण येथे सदिच्छा भेट घेतली.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये जिल्हा बँकेच्या निवडणूकीसंदर्भात चर्चा केली. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे घमासान सुरू आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेले आहे.